व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे.

ही महिला मुंबईहून निंबळक या नगर तालुक्यातील गावी आली होती.  २५ मे रोजी तिची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. त्यामुळे तिच्यावर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. तिचे सिझेरियन करण्यात आले होते. यानंतर त्या जुळ्या मुलांची आणि तिची अशी तिघांचीही प्रकृती उत्तम होती. मात्र अचानक तब्येत बिघडल्यामुळे या महिलेला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

डिलिव्हरी नंतर काही वेळाने अचानक या महिलेची प्रकृती ढासळत गेली. या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती, असे नोडल अधिकारी डॉ बापूसाहेब गाढे यांनी सांगितले आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या रोज वाढत असून आज दिवसभरात ९ रुग्ण आढळले आहे. रुग्णांमध्ये मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरातून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ११२ झाली असून ५८ रन पूर्णतः बरे झाले आहेत. १० जणांचा मृत्यू झाला आहे. ४६ जण अद्याप उपचार घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.