एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; आत्मघातकी स्फोट घडवून मारण्याचा कट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. इतकंच नव्हे तर आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही सांगण्यात येत आहे त्यामुळे खळबळ उडाली असून संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे.

महिनाभरापूर्वीच एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. यापूर्वीही शिंदेंना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता त्यानंतर गुप्तचर विभागानेच याबद्दल माहिती दिली आहे. बीकेसीवर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याआधी मिळालेल्या धमकीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

तत्पूर्वी आषाढी वारीच्या वेळीही एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आली होती. त्यानंतर आता पीएफआयवर बंदी घातल्यानंतर अशा प्रकारची धमकी आली आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या धमकी नंतर एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी आणि ठाण्यातील घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.