डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये; फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे???

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने बनावट बनावट नोटांच्या रॅकेट ला फडणवीस सरकारच संरक्षण होत असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक ट्विट केलं आहे.

कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणइ डुकरालाही तेच आवडत असतं, अशी खोचक टीका फडणवीस यांनी ट्विट करत केली आहे.

नवाब मलिक यांनी काय केले आरोप-

बनावट नोटांच्या रॅकेट ला फडणवीस सरकारच संरक्षण होत असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. नोटबंदी ने काय साध्य झाले….देशभरात बनावट नोटा जप्त झाल्या, पण महाराष्ट्रात बनावट नोटा जप्त झाल्या नाहीत, ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात एकही बनावट नोटा पकडण्यात आल्या नाही. कारण फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता. ८ ऑक्टोबर २०१७ १४ कोटी ५६ बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली.

Leave a Comment