नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने अतिशय चांगला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील याबाबत माहिती दिली. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाख रूपयांपर्यंतचे पीक कर्ज ० टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बिनव्याजी पीक कर्जाची ही सवलत पूर्वी केवळ १ लाख रूपयांपर्यंत होती. या निर्णयाचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा लाभ होईल. अस ट्विट अशोक चव्हाण यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like