कराड | तांबवे (ता. कराड) येथे भैरवनाथ मंदिरात सोमवारी दिप उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो भाविक दिप घेवून आरतीसाठी उपस्थित होते. श्रावणी शेवटच्या सोमवारी श्री. भैरवनाथ देव तांबवे गावात एक महिना मुक्कामासाठी येत असतो. यावेळी दररोज सकाळ व संध्याकाळी आरतीसाठी भाविक मोठ्या प्रमाणावर जमत असतात.
भैरवनाथ देव हा पाठरवाडी येथे मंदिरात 11 महिने असतो. केवळ 1 महिन्याकरिता तांबवे येथे मुक्कामी येतो. या दरम्यान, तांबवे गावासह परिसरातील भाविक दररोज सकाळी 6 वाजता आंघोळ व अभिषेक घालण्यासाठी मोठी गर्दी करतात. तर सायंकाळीही आरतीचे आयोजन केले जाते. यावेळी विजय गुरव, अमर गुरव, सुनिल गुरव, अनिकेत गुरव, आयन गुरव, दत्ता गुरव, अनिरूध्द गुरव, सागर गुरव व पवन गुरव हे पूजा अर्चा करत असतात. एक महिना मुक्काम झाल्यानंतर घटस्थापनेला भैरोबा देव पाठरवाडी येथे पुन्हा मंदिरात जात असतो.
तांबवे (ता. कराड) येथील भैरवनाथ मंदिरात दिप उत्सव pic.twitter.com/eHd9UVoyN1
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) September 13, 2022
तांबवे येथे सोमवारी दि.13 सप्टेंबर रोजी दिप उत्सव आयोजित करण्यात आला. मंगळवारी आंघोळीसाठी कोयना नदीपात्रात नेण्यात येते. तेथून गाव प्रदर्शना घालण्यात येते. त्यानंतर दक्षिण तांबवे, बागेतील भैरोबा येथे मंदिरात शुक्रवारी दि. 16 रोजी मुक्कामी जाणार आहे. तेथे विजय गुरव यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तेथून आरेवाडी येथे दोन दिवस मुक्काम व महाप्रसाद आणि पुढे पाटील मळा येथे विठ्ठल मंदिरात मुक्काम असणार आहे. गमेवाडी येथील मुक्कमानंतर 24 सप्टेंबर रोजी भैरवनाथ देव पाठरवाडी येथे मंदिरात जाईल.