हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का?; दीपाली सय्यद यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना व राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या दरम्यान शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत या राजकीय घडामोडीवर आपली प्रतिक्रिया दिली देत भाजपवर निशाणा साधला आहे. “हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का?, असा सवाल यांनी ट्विट करत फडणवीसांना केला आहे.

दीपाली सय्यद यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का? भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी? भाजपाने या प्रश्नाचे उत्तर दिल्यास सर्व सत्य असत्य बाहेर येईल, असे सय्यद यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४० आमदार घेऊन शिवसेने विरोधात बंड पुकारलयामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. परिणामी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत राजीनामा देत असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी शासकीय वर्षा निवासस्थान देखील सोडले आहे. हे सर्व ज्या मुद्यांसाठी सुरु आहे तो हिंदुत्वाचा मुद्दा आहे. याच मुद्यावरून आता दीपाली सय्यद यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.