व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुरणपोळी खाके वेगळा विदर्भ मांग्या, जिसको हलके मे लिया वो है रे टरबूज भोंग्या; दीपाली सय्यद यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील सभेत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची वजन आणि वयावरून खिल्ली उडवली होती. त्याला फडणवीसांनी व अमृता फडणवीसांनीही उत्तर दिले होते. यावरून आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी फडणवीस दांपत्यावर निशाणा साधला आहे. ‘वजनदारने पुरणपोळी खाके हलकेसे वेगळा विदर्भ मांग्या, जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या, अशा शब्दात सय्यद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिल्यानंतर दीपाली सय्यद यांनी ट्विट करत फडणवीसांवर अत्यंत आक्रमक शब्दात निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये सय्यद म्हणाल्या की, “वजनदारने पुरणपोळी खाके हलकेसे वेगळा विदर्भ मांग्या, दुसरो को हल्का करने के चक्कर मे मामी का युसूफ लकडावाला से ढोंग्या. जिसको हलके मे लिया है वो महाबली हल्क है रे टरबूज भोंग्या,” अशा शब्दात सय्यद यांनी निशाणा साधला आहे.

भाजपलाही दिला इशारा

काल पुण्यात भाजपच्या केंद्रीयमंत्री स्मृती इराणी या आल्या होत्या. त्यावेळी त्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घेतला. यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहार. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून “महिलांवर हात उचलाल तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावु , केंद्रातल्या जर्शी म्हशीला गोबर गॅसची आठवण करून देऊ. जसे पेराल तसे ऊगवुन देऊ,” असा इशारा दिला आहे.