संरक्षण प्रमुखांचं हेलिकॉप्टर कोसळले

बिपीन रावत यांच्यासह 9 जण प्रवास करत असलेल्या हॅलिकाॅप्टरला अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये नुकतीच एक दुर्घटना घटना घडली आहे. या ठिकाणी भारतीय संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर कोसळले असून दुर्घटनेनंतर तीन लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. यावेळी सीडीएस बिपीन त्यांची पत्नी, पायलट यांच्यासह लष्कराचे बडे अधिकारी उपस्थित होते.

लष्कर, हवाई दल आणि नौदल अशा तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सीडीएस) म्हणून विद्यमान लष्करप्रमुख म्हणून बिपीन रावत यांनी जबाबदारी पार पडली आहे. देशाचे पहिले ‘सीडीएस’ बनण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. दरम्यान आज ते आपल्या कुटूंबासह भारतीय संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरमधून निघाले होते. यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनडूमधील कुन्नूर परिसरात आले असता खाली कोसळले.

तामिळनाडूत सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी आणि रावत त्यांच्या पत्नीसह होते. हेलिकॉप्टर कोसळले आणि आगीचे भीषण लोट उसळले. कित्येक दूरवरून लोकांनी मदतीसाठी धाव घेतली.

असा झाला अपघात?

सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परत येत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे वातावरण खराब आहे. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते.

हेलिकॉप्टरमध्ये होते इतके लोक?

सीडीएस बिपीन रावत
मधुलिका रावत
ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर
लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
गुरुसेवक सिंग
जितेंद्र कुमार
विवेक कुमार
बी. साई तेजा, सतपाल