भारताच्या एक इंचही जमिनीवरही कब्जा करू देणार नाही- राजनाथ सिंह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लडाख । भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (बुधवार) लेहचा दौरा केला. यांचा पूर्व लडाखमधील भारत चीन-सीमेवरील तणाव अजून पूर्णपणे निवळला नसून राजनाथ सिंह लेहचा दौरा महत्वाचा समजला जात आहे. आजच्या दौऱ्यात त्यांनी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लडाखमधील लुकुंग चौकीवर राजनाथ सिंह यांनी जवानांना संबोधित केलं. “भारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही किंवा त्यावर कब्जा करूही शकणार नाही याची मी शाश्वती देतो,” असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

“आम्हाला अशांतता नाही तर शांतता हवी आहे. भारतानं कोणत्याही देशाच्या स्वाभीमानावर कधी हल्ला केला नाही. परंतु भारताच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर झाला तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांना जशास तसं उत्तर देण्यात येईल,” असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“जर भारताच्या स्वाभिमानावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यांना योग्य भाषेत उत्तरही दिलं जाईल. सध्या भारत आणि चीनदरम्यान जी काही चर्चा झाली ती सकारात्मक आहे. या प्रकरणाचा तोडगा निघाला पाहिजे. परंतु हा तोडगा कुठपर्यंत निघेल याची सध्या कोणतीही हमी मी आता देऊ शकत नाही,” असं राजनाथ सिंह जवानांना संबोधित करताना म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment