दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात चिंतेचे वातावरण ; आणखी एक मोठा खेळाडू झाला जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्ली कॅपिटलने काल किंग्स इलेव्हन पंजाब वर सुपर ओव्हर मध्ये मात केली. पण विजय मिळवून देखील दिल्ली साठी एक चिंतेची बाब आहे. दिल्लीचा हुकमी एक्का रविचंद्रन अश्विन काल गोलंदाजी करताना जखमी झाला आणि तो पॅवेलियनला परतला. दिल्लीसाठी ही वाईट बातमी आहे. या सामन्याच्या काही तास अगोदर इशांत शर्मा देखील जखमी झाला होता.

षटकातील शेवटच्या चेंडूवर फॉलो थ्रूमध्ये चेंडू थांबविल्यानंतर त्याच्या खांद्यावर दुखापत झाली. फिजिओ जेव्हा त्याला मैदानाबाहेर घेऊन जात होता, तेव्हा तो वेदनेन विव्हळत होता.

रविचंद्रन अश्विनने काल एकच षटक गोलंदाजी केली. त्याच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनने करुण नायरला पृथ्वी शॉच्या हातून झेलबाद केले.  यानंतर निकोलस पूरन चौथ्या चेंडूवर त्रिफळाचीत केले.

रविचंद्रन अश्विनच्या दुखापतीविषयी अद्ययावत माहिती देताना श्रेयस अय्यर म्हणाला, “अश्विनची षटके महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे खेळ आमच्या बाजूने बदलला, पण ते टी 20 क्रिकेट आहे. अश्विन म्हणतो की, तो पुढील सामन्यासाठी सज्ज असेल, पण शेवटी फिजिओ निर्णय घेणार आहे. अक्षर पटेलदेखील मधल्या षटकांत शानदार गोलंदाजी केली होती” .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment