दिल्लीहून उड्डाण घेताच SpiceJet विमानाच्या केबिनमध्ये लागली आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या स्पाईस जेट (SpiceJet) विमानाच्या केबिनमध्ये चारी बाजूनं अचानक धूर येऊ लागला. हा धूर येत होता तेव्हा विमान (SpiceJet) तब्बल 5 हजार फुट उंचीवर होते. केबिनमधील धूर लवकरच विमानाच्या सर्व भागात पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर या विमानाला (SpiceJet) तातडीनं दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.

दिल्लीहून जबलपूरला जाणाऱ्या विमानात (SpiceJet) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या विमानातील (SpiceJet) सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे. या विमानातील सर्व प्रवासी सध्या दिल्ली विमानतळावरच असून त्यांना दुसऱ्या विमानानं जबलपूरला पाठवण्यात येणार आहे.

15 दिवसांमधील दुसरी घटना
विमानाने (SpiceJet) पेट घेल्याची हि 15 दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी 19 जून रोजी पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानाने पेट घेतला होता. या विमानाच्या इंजिनाला आग लागली होती. या विमानात 185 प्रवासी होते. विमानानं उड्डाण घेताच त्यानं पेट घेतला.विमानानं (SpiceJet) उड्डाण घेताच त्यामधील इंजिनातून धूर बाहेर पडत असल्याचं आढळलं. यानंतर विमान तात्काळ सुरक्षितपणे उतरवण्यात आले होते.

हे पण वाचा :
सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे Gold Loan वर काय परिणाम होतो ???

चांदोबाचा लिंबमध्ये माऊलीच्या अश्वांचे पहिले उभे रिंगण उत्साहात

मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेची घोषणा होताच गोव्यात शिवसेना आमदारांचा जल्लोष

अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी; शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना दिल्या खास शुभेच्छा

शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचे अभिनंदन; व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

Leave a Comment