Monday, January 30, 2023

उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुणेकरांसाठी महत्वाची घोषणा; म्हणाले की..

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारच्यावतीने निर्बंध हटवण्यात आलेले आहेत. तरीही कोरोनाच्या स्थितीबाबत दररोज माहिती घेतली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुणे येथील नागरिकांसाठी महत्वाची घोषणाही केली. पुण्यात दरवर्षी साजरा केला जाणारा दिवाळी पहाट कार्यक्रमांना कोरोनामुळे बंदी घालण्यात आली होते. त्यांना आता राज्य सरकारच्यावतीने परवानगी देण्यात आली असल्याची घोषणा पवारांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे आज माद्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दोन वर्षापासून संपूर्ण राज्याला कोरोनाच्या संकटाचा सामोरे जावे लागत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे उत्सवावर बंधने घालण्यात आली होती. आता ही बंधने शिथील करण्यात आलेली आहेत. पुण्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर कोरोना आता राहिला नसल्याने दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात आली होती. या त्यांच्या मागणीला आम्ही परवानगी देत आहोत.

- Advertisement -

पुणेकरांसाठी आज एक आनंदाची बातमी जरी देत असलो तरी त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि जरी आता नाही असे म्हणत असला तरी कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली असेल तरीही त्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले.