ओमिक्रॉनचा संसर्ग होतोय, बूस्टर डोसबाबत केंद्राने योग्य तो निर्णय घ्यावा; ओमिक्रॉनबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात ओमिक्रोनचे रुग्ण सापडल्यानंतर आता राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. मुंबईत रुग्ण सापडल्यानंतर काल पुणे आणि पिपंरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ओमिक्रोनबाबत केंद्र सरकारकडून कडक भूमिका घेतली पाहिजे. बूस्टर डोसची गरज असल्यास केंद्र सरकारकडून तातडीने उपाय करणे गरजेचे आहेत. त्यामुळे या डोसबाबत केंद्राने योग्य तो निर्णय घ्यावा, असे पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यावर सध्या वेगवेगळी संकट येत असतात. मात्र, त्या संकटावर मार्ग काढायचा असतो. राज्याती काहीजणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला आहे. त्यानिमित्ताने आता आपल्याला खबरदारी घेऊन सर्वांचीच काळजी घ्यावी लागेल.

राज्यात वाढत असलेल्या ओमिक्रोनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. ओमिक्रॉनबाबत सांगायचे झाले तर दोन डोस घेतलेल्यानाच ओमिक्रोनची लागण होत आहे. यासाठी आतंरराष्ट्रीय विमानतळावर निर्बध लावणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगितले.

You might also like