उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसलेला नाही – अजित पवार संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणच्या नुकसानीपैकी सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसान भागाची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे. दरम्यान पवार यांनी बारामती या ठिकाणी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांवरही पवार यांनी चांगलाची आगपाखड केली. यावेळी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला आहे का? असा सवाल यावेळी पवार यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीचा दौरा केला. या दौऱ्यास सुरुवात झाल्यानंतर आज सकाळी बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे अजितदादांचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी एक व्यक्ती आपलंले काम घेऊन अजित पवार यांच्याकडे आला. यावेळी आपल्या कामाचे निवेदन त्या व्यक्तीने पवारांकडे दिले. ‘माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ती यामध्ये लक्ष घालून मला सहकार्य करावे’, अशी विनंती संबंधित व्यक्तीने पवारांनी केली असता पवार चांगलेच संतापले.

यावेळी संतापलेल्या पवारांनी अधिकारी तसेच त्या ठिकाणी असलेल्या काही व्यक्तींना सुनावले. ‘बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल’, असे पवार यांनी यावेळी बोलताना म्हंटले. तर काम घेऊन आलेल्या व्यक्तीला पेअर यांनी सूचनाही केल्या. ‘चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका, असे पवार म्हणाले.

You might also like