Wednesday, February 8, 2023

दोन बायकांचा दादला तरी ’40’ वर्षीय व्यक्तीवर 18 वर्षांची युवती फिदा

- Advertisement -

औरंगाबाद | एका चाळीस वर्षीय कराटे शिक्षकाने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला. दुसरीशी लग्न केले. आता 18 वर्षीय तरुणीसोबत प्रेम जुळले. आणि तो तिच्या सोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागला. आणि धक्कादायक म्हणजे या शिक्षकाची मोठी पोरगी सोळा वर्षाची होती. गुरुवारी या तरुणीचे आई-वडील तिला घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा त्याने वाद करून गोंधळ भरला हा प्रकार पुंडलिक नगर ठाण्याच्या हद्दीत भारत नगर मध्ये घडला आहे.

कराटे शिक्षक हा भारत नगर परिसरामध्ये राहतो त्याचे पहिल्या पत्नीशी सतत वाद विवाद व्हायचे. यामुळे तिने स्वतःला पेटवून घेतले होते आणि यात ती गंभीर जखमी झाली होती या तक्रारीवरून शिक्षका विरुद्ध कौटुंबिक अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या शिक्षकांनी दुसरा विवाह केला. आणि सध्या तो त्याच्या दुसर्‍या पत्नीसोबत संसार करीत आहे . त्याला एक सोळा वर्षाची आणि तेरा वर्षाची अशा दोन मुली आहेत. आणि आता करते शिकवता शिकवता त्याचे मन एका 18 वर्षीय तरूणीवर जडले काही दिवसापासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. आणि त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला सुरुवात केली. ही तरुणी 18 वर्षाची झाल्यानंतर गुरुवारी तो तिला स्वतःच्या घरी घेऊन आला.

- Advertisement -

दुसऱ्या पत्नीला या प्रेमसंबंधांमुळे फारसा विरोध दिसून आला नाही. तरुणीच्या आईवडिलांनी गुरुवारी शिक्षकाच्या घरी जाऊन मुलीला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिक्षकाने तिथे विरोध केला आणि गोंधळ घातला. मात्र तरुणीने आई-वडिलांसोबत जाण्यास नकार दिला व त्यांचे ऐकण्यास ती तयार नव्हती. वाढल्यावर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे पोलीस अमलदार विलास डोईफोडे यांनी लिवे नाशिक मध्ये राहणाऱ्या शिक्षक आणि तरुणीला व तिथे असणाऱ्या सर्वांना ठाण्यात घेऊन गेले.