फडणवीसांचा तब्बल 14 ट्विटद्वारे शरद पवारांवर हल्लाबोल; ‘या’ मुद्यांवरून साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती मनसेश भाजपकडून टीका करत निशाणा साधला जात आहे. आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकामागून एक अशी तब्बल 14 ट्विट करून पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्या ट्विटच्या माध्यमातून फडणवीस यांनी शरद पवार यांनी कलम 370 बद्दल केलेल्या भाष्याचा दाखला दिला आहे. तसेच जातीयवादी राजकारण हा शरद पवार व राष्ट्रवादीचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे,” अशी टीकाही केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी ट्विट करीत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी 2012मधील घडलेल्या आझाद मैदानावरील घेत नेवरून पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी 2012 साली राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना मुंबईतील आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली गेली असल्याचे सांगत यावरुनही बातमीची लिंक पोस्ट केली आहे. तसेच आघाडी सरकारने त्यावेळी रझा अकादमीवर कारवाई केली नाही? असा सवालही उपस्थित केला आहे.

संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला? असा सवाल फडणवीस यांनी पोस्ट टाकत केला आहे. तसेच अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो या शरद पवारांच्या वक्तव्याची आठवणही फडणवीसांनी करुन दिली.

त्याच प्रमाणे फडणवीस यांनी महत्वाच्या असलेल्या अशा एका मुद्यांवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर 13 वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्या संदर्भातही फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रकारे फडणवीस यांनी तब्बल १४ ट्विट करीत पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

Leave a Comment