Monday, January 30, 2023

पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी-शिवेसेनेला कापरं भरलंय; फडणवीसांचा खोचक टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीला कापरं भरलं आहे आणि त्यामुळे त्यांनी पाळत ठेवली असावी असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

आपल्याच सहकाऱ्यावर अशा प्रकारची पाळत ठेवली जाते, असं स्वतः तिन पक्षांच्या सरकारमधील एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बोलतोय, हे महाविकास आघाडी सरकार म्हणून अत्यंत गंभीर आहे. तिन पक्षाच्या सरकारमध्ये आपापसातच सुसंवाद नसेल तर राज्याच्या जनतेला आपण काय देणार आहोत, हा प्रश्न निर्माण होतो अस म्हणत फडणवीसांनी टीका केली.

- Advertisement -

नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कापरं भरलं आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेला जेवण जात नाही, पाणी देखील पिता येत नाही आहे. ते अत्यंत घाबरले असल्यामुळे त्यांना नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली आहे. असं आता नाना पटोलेंच्या वक्तव्यातून पाहायला मिळत आहे असे फडणवीसांनी म्हंटल.