देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंच्या भुमिकेचे स्वागत; नाणार प्रकल्पाबाबत राज यांची भूमिका योग्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असून महाराष्ट्राच्या भल्यासाठी नाणार प्रकल्प गमावू नका अस थेट पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं होत. दरम्यान राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत  घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो येवडच नव्हे तर शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

राज यांची भूमिका राजकारणाच्या पलीकडची – सुधीर मुनगंटीवार

दरम्यान, राज यांची भूमिका राजकारणाच्या पलीकडची असून महाराष्ट्राला शक्तीशाली करण्याकरता आहे. असे प्रकल्प राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment