व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सर्वात मोठी बातमी! अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीस निर्दोष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलनावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. परंतु हा लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याची मोठी माहिती जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी दिली आहे. तसेच, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निर्दोष असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षणाची मागणी करत अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांनी आंदोलन पुकारले होते. याच आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले होते. मुख्य म्हणजे, हा हल्ला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून करण्यात आला असल्याचा आरोप विरोधकांकडून आणि मराठा बांधवांकडून करण्यात आला होता. त्यामुळे या घटनेचा तपास करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता. या अर्जाला पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे.

कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी केलेल्या अर्जावर उत्तर देत उपाधीक्षक आर सी शेख यांनी माहिती दिली आहे की, आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीचार्ज गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे या प्रकरणात देवेंद्र फडणवीस निर्दोष आहेत. तसेच, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतेही आदेश देण्यात आलेले नव्हते. दरम्यान आर सी शेख यांनी केलेल्या या खुलाशामुळे देवेंद्र फडणवीस निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे.