व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

काही लोकांनी 2019 मध्ये बेईमानी केली; मोदींसमोरच फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत आले असून त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीकेसी येथील जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींसमोरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मोदीजी, महाराष्ट्रातील जनतेने डबल इंजिन सरकार आणून दिले परंतु काही लोकांनी तेव्हा बेईमानी केली आणि अडीच वर्ष जनतेच्या मनातील सरकार बसू शकलं नाही. पण आता बाळासाहेबांचे एकनिष्ठ अनुयायी एकनाथ शिंदे यांनी हिंमत दाखवल्याने पुन्हा आपण सरकार आलं असं त्यांनी म्हंटल.

फडणवीस म्हणाले, मोदीजी, तुम्ही 2019 मध्ये सांगितलं होतं की पाच वर्षाच्या डबल इंजिन सरकार आणा. आपल्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील नागरिकांनी डबल इंजिनच सरकार आणलं. पण काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनाचं सरकार नाही बनू शकलं. पण बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली आणि आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातलं सरकार इथे स्थापन झालं. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पुन्हा एकदा पुढे जाऊ लागला असं म्हणत फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला .

फडणवीस पुढे म्हणाले, आज अनेक कार्यक्रमाचे उद्घाटनं आणि भूमिपूजन होणार आहे. मात्र त्यात पंतप्रधान स्वनिधी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. करोना काळात पंतप्रधान मोदींनी टपरीवाल्यापासून हातगाडीवाल्यापर्यंत सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वनिधीची निर्मिती केली. मात्र, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि त्यात गरिबांना पैसे देणारी योजना महाराष्ट्रात लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यांनतर आमचं सरकार आले आणि आम्ही लगेच बैठक घेऊन १ लाख फेरीवाले आणि छोट्या दुकानदारांना स्वनिधीचा फायदा देण्याचा निर्णय घेतला असं फडणवीसांनी म्हंटल.