आम्ही निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली; देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना टोला

Devendra Fadnavis Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी काल मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. निवडणुकीत भाजपला मविआसोबत असलेल्या आमदारांपैकी काही अपक्ष आमदारांना फोडण्यात यश आले. या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेसह संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “आमचे तिसरे उमेदवार हे शिवसेनेच्या संजय राऊतांपेक्षाही जास्त मतांनी विजयी झाले. त्यांना सांगू इच्छितो की, आम्ही निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली होती, जय महाराष्ट्र, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

राज्यसभेच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाल्यानंतर भाजपने विधान भवनाच्या पायऱ्यांवर आनंद साजरा केला.या यावेळी देवेंद्र फडणवीस याणी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज जो आम्हाला विजय मिळाला आहे. तो हा आम्ही आमच्या दोन लढवय्या आमदारांना देत आहोत. एक म्हणजे मुक्ता टिळक आणि दुसरे लक्ष्म जगताप हे होय. ते आजारा असतानाही मतदान करण्यासाठी हजर राहिले. हा विजय आम्ही त्यांच्यासह महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो. जे स्वतःला महाराष्ट्र, मुंबई समजतात. त्यांना या विजयाने लक्षात आणून दिले.

संजय राऊतांपेक्षा भाजपच्या उमेदवारांना जास्त मतं

यावेळी फडणवीसांनी राऊतांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले, त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मते घेतली आहेत. पियुषजी 48 मतांनी निवडून आले, आमचे डॉ. बोंडे यांनाही तेवढीच मतं मिळाली. तर आमच्या धनंजय महाडिकांना 41 पाईंट 56 मते मिळाली आहेत. जी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.