ठाकरे सरकार हे नालायक सरकार; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील या ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात सर्व सामान्य जनतेशी शेतकऱ्यांवर अन्याय केला. या सरकारने कोरोनात बारमालकांचं भलं केलं आणि 50 टक्के दारु लायसन्सची फी रद्द केली.जिथे जाऊ तिथे खाऊ असं हे सरकार आहे. या सरकारने वेश्यांसाठी दिल्या जाणार्‍या निधीत सुद्धा भ्रष्टाचार केला. असे हे ठाकरे सरकार हे नालायक सरकार आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

आज गडचिरोली भाजपच्या वतीने महाजन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठी दिल्या जाणार्‍या निधीत सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला. असे करणार्‍यांना काय म्हणतात, ते मी सांगणार नाही. तो शब्द संजय राऊत वापरतात.

राज्यातील भ्रष्टाचारी, घोटाळेबाज, अत्याचारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला जात आहे. या महाविकास सरकारमध्ये भ्रष्टाचाराची ट्वेंटि-ट्वेंटी सुरू आहे. मुंबईतील बिल्डरांचा कर थकला आहे, हिंमत असेल तर तो वसुल करा. त्यांच्याकडून मालपाणी मिळते, म्हणून तेथे ढिल आणि आमच्या शेतकर्‍यांकडून जुलमी वसुली सुरू आहे.

ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र – फडणवीस 

यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, भाजपाचा एकही कार्यकर्ता जिवंत आहे, तोवर हे राजकारण संपू देणार नाही. अखेरच्या क्षणापर्यंत भाजपा ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील. काय सांगायचे? बांधावर जाऊन 50 हजार देऊ. पण, आज स्थिती काय आहे? 5 हजार रुपये शेतकर्‍यांना द्यायला तयार नाही. आमच्या पाठित सोडा, या सरकारने सामान्य माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आदिवासींसाठीच्या अन्नधान्याच्या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार हे सरकार करते आहे. कुत्रा देखील खाणार नाही, असे धान्य आदिवासींना देण्यात येते आहे. आदिवासींच्या तोंडचा घास पळविणारे हे पापी सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Leave a Comment