“माझ्या वडिलांना 2 वर्ष इंदिरा गांधींनी जेलमध्ये ठेवलं, मी ही घाबरत नाही”; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने तुरुंगात ठेवले. त्यांनीही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही जेलला घाबरणारे नाही. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे अशा प्रकारच्या मुद्द्यावर आम्ही लढतच राहणार,” असा इशारा फडणवीस यांनी दिला.

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी भाजप नेत्यांनीविरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीवरून आक्रमक पावित्रा घेतला. यावेळी फडणवीस यांनीही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. सभागृहाच्या कामकाजावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटिसींबाबत माहिती दिली. त्यावर फडणवीस म्हणाले की, मला प्रश्नावली पाठवण्यात आली होती. त्यावर मी लेखी उत्तर देऊन सांगितलं होतं की मला उत्तर द्यायचं आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1396133184170479

मला जी प्रश्नावली पाठवण्यात आली होती त्यातील प्रश्न साक्षीदाराचे होते. कालचे प्रश्न आरोपीसाठीचे होते. तुम्ही ऑफिशियल सिक्रेसीचा भंग केला का? असा प्रश्न मला विचारण्यात आला. असं साक्षीदाराला विचारतात का? जाणीवपूर्वक प्रश्नावली बदलून या व्यक्तीला गुंतवता येतं का हेही यातून दिसत होतं. मी वकील आहे. मलाही समजते. एक नागरिक म्हणून व्हिसल ब्लोअर अॅक्टप्रमाणे मी प्रोटेक्टेड आहे. जे कागदपत्रे माझ्याकडे होते. ते मी कुणाला दिले नाही. केंद्रीय गृहसचिवांना मी ते दस्ताऐवज दिले, असे फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Comment