सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे नियोजन सुरू : शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून निर्णय होतील ते आम्हाला योग्य वेळी कळवतील. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारबाबत नाराजी आहे, हे कालच्या घटनेने उघड झाले आहे. सरकार टिकेल न टिकेल हे लवकरच समजेल. देवेंद्र फडणवीस शांत बसतील अस आम्हाला तरी वाटत नाही. सरकार स्थापन करण्यासाठी त्यांचे नियोजन सुरू आहे. कालच्या परिवर्तनाची ही सुरुवात आहे. लवकरच परिवर्तन घडेल हे येणाऱ्या काळात पहायला मिळेल असे सूचक विधान भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे.

विधानरिषदेच्या विजयानंतर साताऱ्यात मोती चौक येथे आज भाजपने फटाके फोडून आणि सातारी कंदी पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे यांना पुष्पहार घालून आणि पेढे भरवून सत्कार केला. महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार असल्याचे भाकीत सातारचे आ. शिवेंद्रराजे भोसलें यांनी बोलताना केले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना व काँग्रेसची मते फोडली. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून ते सध्या नॉट रिचेबल आहेत. गुजरात राज्यातील सुरतमध्ये एका हाॅटेलमध्ये शिवसेनेचे काही आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील नाराजी उफाळून आलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मध्यवर्ती निवडणुकांची सध्यातरी चर्चा नाही. पक्षाच्या बैठकीत कोणीही सुतोवाच केलेले नाही. मात्र, अस्थितरतेची परिस्थिती राहिली, तर आम्ही पक्षाने सूचना केली तर आम्हीही मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार आहोत.

Leave a Comment