“राऊत रोज कायतरी बोलतात, त्यांना मी फार महत्व देत नाही”; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना काल ईडीनं अटक केल्याच्या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज निशाणा बोलत साधला. “सात वर्षांपासून लोक वाट पाहत आहेत एप्रिलफुल आहे. मात्र, विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावे कि सुडाचं राजकारण आम्ही करत नाही नि रोज रोज येणार असे बोलत आहेत, अशी टीका राऊत यांनी केल्यानंतर फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद सांधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या शिवसेना नेते संजय राऊत हे काहींना काही तरी बोलत आहेत. ते रोज माध्यमांसमोर येतात आणि बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे तसेच त्यांना मी फारसे महत्व देत नाही.

सतीश उके यांच्यावर जमिनीशी संबंधित गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. या प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. मूळ कारवाई ही नागपूर पोलिसांची आहे. उके यांच्याविरुद्ध 2005 पासून वेगवेगळ्या प्रकारच्या एफआयआर आहेत. वेगवेगळ्या न्यायाधीसांची खोटी तक्रार केल्याबद्दल कंटेम्ट ऑफ कोर्ट मुंबई उच्च न्यायालयात झाला. त्यांनी त्यांना शिक्षा दिली. सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं ती शिक्षा का वाढविण्यात येऊ नये, अशा प्रकारचा निर्णय दिला. त्यामुळं ईडी कायद्यानुसार कारवाई करेल, असेही यावेळी फडणवीस यांनी म्हंटले.