येरवळे जुन्या गावात रंगला धामण धामणीचा प्रणयाचा खेळ

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथील जाधव आळीत कडक उन्हाच्या भर दुपारी धामण व धामिनी सापांचा प्रणयाचा खेळ रंगला. यावेळी हा खेळ पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अनेकांनी त्याचा हा खेळ आपल्या कॅमेऱ्यात कॅमेराबद्ध केला.

कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथे बुधवारी दुपारच्या कडक उन्हात दोन नर व मादी धामनीमध्ये प्रणयाचा खेळ चांगलाच रंगला. यावेळी सुमारे पाच ते सहा तास हा खेळ चालल्याने गावातील ग्रामस्थांनी तो आपल्या मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध केला.

मार्च एप्रिल हा धामण जातीच्या सापांचा मिलनाचा काल असतो. दरम्यान काल येरवळे जुने गावठाण येथील जाधव आळीतला हा धामण जुळ्यांचा प्रणयाचा खेळ पार पडला. सुमारे चार ते पाच तासानंतर खेळ पार पडल्यानंतर या जुळ्यातील धामण साप वेगवेगळे होऊन वेगवेगळ्या दिशेला निघून गेले.