हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dhanalakshmi Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Dhanalakshmi Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात बदल केला आहे.
8 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू
Dhanalakshmi Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 8 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदला नंतर आता बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.25% ते 6.10% पर्यंत व्याजदर देत आहे. धनलक्ष्मी बँकेकडून आता 555 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक 7.25 टक्के व्याजदर दिला जाईल. त्याच वेळी, धनम टॅक्स एडव्हांटेज डिपॉझिट व्यतिरिक्त बँक 1 वर्ष आणि त्यावरील सर्व एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 0.50 टक्के दराने अतिरिक्त व्याज दर देईल.
Dhanalakshmi Bank च्या एफडीचे नवीन दर
Dhanalakshmi Bank आता 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.25 टक्के, 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.75 टक्के, 91 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 4.50 टक्के आणि 1 वर्ष किंवा त्याहून जास्त आणि 2 वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के व्याज देईल.
आता धनलक्ष्मी बँकेकडून 555 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के आणि 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 6.00 टक्के व्याज मिळेल. तसेच बँक आता 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.10 टक्के आणि 1111 दिवसांच्या FD वर बँक 6.25 टक्के दराने व्याज देईल. त्याच वेळी, धनलक्ष्मी बँक आता पाच वर्षांपेक्षा जास्त आणि दहा वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.10 टक्के व्याजदर देईल.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात 35 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर, पॉलिसी रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dhanbank.com/interest-rates/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे