Wednesday, March 29, 2023

पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय…! धनंजय मुंढेंचा आशिष शेलारांना टोला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षी फडफडायला लागला की समाजायचं नेम अचूक बसलाय, असं म्हणत  राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आशिष शेलार यांना ट्विटद्वारे टोला लगावला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू…आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर, विनोदीच आहे सगळं…! पालिकेत अबकी बार भाजपा सरकार…! असं वक्तव्य शेलार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनी  उत्तर दिले आहे.

- Advertisement -

दरम्यान राज्यात सत्तेपासून दूर रहावे लागल्याने कासावीस झालेल्या भाजपाच्या आशिष शेलार यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता तुम्ही करू नका. कोण बेडूक आणि कोण वाघ-सिंह आहे, हे जनतेला समजले आहे, अशा शब्दात महेश तपासे यांनी शेलार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.