दुचाकी चोरांची धूम सुरूच! आणखी पाच दुचाकी पळवल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी 4 दुचाकी चोरीची नोंद करण्यात आली तर आज एकूण पाच दुचाकी पळवण्याचे समोर आले आहे.

पांडुरंग अशोक मगर (रा. इमामपूरवाडी ता. पैठण) यांनी 4 ऑगस्ट रोजी सकाळी एमआयडिसी वाळूज भागातील माऊली प्रेस कंपनीच्या पार्किंग मध्ये दुचाकी (एमएच 28 वाय 2499) उभी केली होती. चोरट्याने भरदिवसा त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून पळवली. याप्रमाणेच राजेंद्र रंगनाथ जोशी (रा. हर्सूल) यांनी 2 ऑगस्ट रोजी घरासमोर दुचाकी (एमएच-20 एफबी-7316) उभी केली होती. त्यांची दुचाकी चोराने मध्यरात्रीच्या सुमारास लांबवली.

सागर सुरेश राऊत (राहणार एकता नगर, जटवाडा रोड) हे हिमायत बागेतील फलोत्पादन खात्यात नोकरीला आहेत. त्यांची 1 ऑगस्ट रोजी दुपारी हिमायत बागेतील ज्ञानोबा मुंडे यांच्या घराशेजारील मैदानात दुचाकी (एमएच-20 डीक्यू-8175) उभी केली होती. त्यांची दुचाकी चोराने लंपास केली. तसेच राम सुभाष तोंड गिरे राहणार सोनार गल्ली पदंपुरा यांनी दोन ऑगस्ट रोजी रात्री घरासमोर दुचाकी (एमएच-20 सीपी-2122) उभी केलेली असताना चोराने त्यांची दुचाकी मध्यरात्री लांबवली. तसेच किशोर वामनराव ओलेकर (रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी रोड) यांनी 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी अदालत रोडवरील अलकनंदा कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये बुलेट उभी केली होती. चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने त्यांची बुलेट भरदिवसा पळवली. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment