खासदार उदयनराजेंची काळजाचा ठोका चुकवणारी धूम स्टाईल जिप्सी राईड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

खासदार उदयनराजे भोसले आपल्या धूम स्टाईल बाईक राईड आणि कार ड्रायव्हिंगने नेहमीच चर्चेत असतात. असाच एक त्यांच्या कार ड्रायव्हिंगचा व्हिडिओ साताऱ्यात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये खासदार उदयनराजे भोसले आपल्या जलमंदिर या निवासस्थाहून जिप्सी चालवताना दिसत आहेत. सायलेन्सरचा जोरदार आवाजात हवेला कापत अत्यंत्य जोरात गाडी चालवताना बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. जलमंदिर ते राजवाडा या राईडदरम्यान उदयनराजेंच्या चाहत्यांनी त्यांची जिप्सी राईड कॅमेराबद्ध केली आहे.

त्यानंतर आता सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा कार ड्रायव्हिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. यापूर्वीही त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होतो तो म्हणजे सातारा येथील एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी चक्क गाणे म्हणून कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केले होते. यामध्ये त्यांनी ” हमे तुमसे प्यार कितना…. ये नही जाणते. मगर जी नाही शकते तुम्हारे बिना..” हे त्यांनी स्टेजवरून म्हटलेलं गाणं त्यावेळी चंगळच व्हायरल झालं होत.

https://www.facebook.com/watch/?v=127979609417066

नुकत्याच व्हायरल झालेल्या राजेंच्या कार ड्रायव्हिंगच्या व्हिडिओमुळे ते सध्या पुन्हा चर्चेत आलेले आहेत. या व्हिडिओत उदयनराजे भोसले अतिशय थाटात आपली जिप्सी गाडी चालवत आहेत. त्यांची हि स्टाईल लोकांना चान्गलीच आवडली आहे. त्याठिकाणी उपस्तित असलेल्या त्यांच्या चाहत्यांनी उदयनराजे भोसलेंचा तो कार ड्रायव्हिंगचा व्हिडीओ कॅमेराबद्द केला. उदयनराजेंनी यापूर्वीसुद्धा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बुलेट चावलेली आहे. त्यांच्या या बुलेटराईडचाही व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. आताही उदयनराजेंच्या जिप्सी राईडची चांगलीच चर्चा होत आहे.

Leave a Comment