”डायल 112” : चिमुरडीवर अत्याचार करणारा 65 वर्षीय नराधम 10 मिनिटांत गजाआड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी- सातारा | महाबळेश्वर (जि. सातारा) येथे पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या वृद्धाला पकडण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांच्या ”डायल 112” वर कॉल केला. त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत पोलिसांना हवा असलेला संशयित नराधमला रत्नागिरी बसस्थानकातून ताब्यात घेण्यात आला. या संशयितावर लैंगिक अत्याचारासंधार्भात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

याबाबतची माहिती अशी, पुण्यात रहिवाशी असलेल्या 65 वर्षीय वृद्धाने महाबळेश्वर या ठिकाणी आपल्या मेहुण्याच्या अवघ्या 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले आणि तेथून वृद्धाने पळ काढला होता. महाबळेश्वर तालुक्यात ही 10 जानेवारी रोजी घटना घडली होती. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात पिडीत चिमुरडीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर या वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर गुन्ह्यात महाबळेश्वर पोलिसांनी त्या वृद्धाचा शोध सुरू केला. सदरचा संशयित वृद्ध रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात असल्याची खात्रीशीर माहिती महाबळेश्वर पोलिसांना मिळाली होती.

त्यांनी डायल 112 चा वापर करत त्याअंतर्गत रत्नागिरी पोलिसांशी तत्काळ संपर्क साधला. 11 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास डायल 112 वरून रत्नागिरी पोलिसांना मॅसेज मिळाल्यानंतर खेड पोलिसांना तत्काळ कळवण्यात आले. खेड पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे आणि पोलीस शिपाई रुपेश जोगी यांनी तत्काळ खेड बस स्थानकात जाऊन अवघ्या 10 मिनिटात या संशयित आरोपीला ताब्यात घेतला.