परमबीर सिंग यांना 100 कोटींचा साक्षात्कार पदावरून काढल्यानंतर झाला का? राज ठाकरेंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राज्यात अनिल देशमुख प्रकरणावरून एकच खळबळ उडाली असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अनिल देशमुख या प्रकरणावरून भाष्य केले आहे. परमबीर सिंग यांना 100 कोटींचा साक्षात्कार पदावरून काढल्यानंतर का झाला? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत ही त्यांनी ठाकरे सरकारला काही सूचना केल्या आहेत.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, परमबीर सिंग यांना 100 कोटींचा साक्षात्कार पदावरून काढल्यानंतर का झाला? त्यांना काढले नसते तर हे समोर आलं नसतं त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. बार आणि रेस्टॉरंट कडुन शंभर कोटींचे टारगेट अनिल देशमुख यांच्या कडून दिलं गेलं हा आरोप लांच्छनास्पद आहे. पोलीस बदल्यांचा बाजार होतो हे काही नवं नाही असं त्यांनी सांगितलं.

सरकार पाडणं सोप आहे का?

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मंत्र्यांकडून असं काही कृत्य घडत आहेत त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागत आहे. सरकार पाडणे इतके सोपे आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले खालून पिलर काढले म्हणजे पडेल? अनिल देशमुख यांचा राजीनामा हा महत्त्वाचा विषय नाही. महत्त्वाचा विषय मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॉम्ब ची गाडी ठेवली त्याची चौकशी झाली आहे का? पोलिसांनी गाडी ठेवली ती कोणाच्या सांगण्यावरून ठेवली? कोणीतरी आदेश दिल्याशिवाय पोलिस हे कृत्य करणार नाही? जिलेटिन असलेली गाडी कोणी ठेवली? याची चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या हातात राज्य आलय की त्यांच्यावर राज्य आलय काही कळत नाही असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.

कोरोनाबाबत केल्या सूचना

लॉक डाऊन मुळे अनेक व्यवसाय बंद आहेत लोकांकडे पैसे नाहीत त्यात बँक कर्जासाठी दबाव टाकत आहे. अनेक ठिकाणी सक्तीने लोकांकडून पैसे वसूल केले जात आहेत. त्याबाबत बँकांना सूचना द्यावी. सरसकट लॉकडाऊन काळात वीज बिल माफ करणे, व्यवसायिकांना 50 टक्के जीएसटी करात सवलत द्यावी, यासाठी केंद्र सरकारशी बोलावं लोकांना दिलासा देणं महत्त्वाचं आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

शाळा बंद मग फी आकराणी का?

शाळा बंद आहेत मग फी आकारणी का होते आहे?या शाळांनी फी घेऊ नये. मुलांचं वर्ष फुकट जात आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढे ढकललं पाहिजे. लहान मुलांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. दहावी-बारावी परीक्षा न घेता त्यांना पास करा व विद्यार्थ्यांचा विचार करता तसा शाळांमधील कर्मचाऱ्यांचाही विचार व्हावा. अशा विविध मागण्या राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्या आहेत.

क्रीडा मनोरंजन क्षेत्रात जे कलाकार खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सवलत असणं गरजेच आहे. सराव करण्यासाठी परवानगी द्यावी सरकारच्या तिजोरीची अवस्था सगळ्यांना माहीत आहे पण शेतकऱ्यांना हमी भावासाठी पैसे द्यावेत. असे देखील राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment