एकनाथ शिंदेंची सुरक्षा खरंच नाकारली?? वळसे पाटलांचा मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र तरीही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंची सुरक्षा नाकारली असा गंभीर आरोप बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण घडामोडींबाबत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याना विचारलं असता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत सुहास कांदे यांचा आरोप फेटाळला आहे.

एकनाथ शिंदे याना आलेल्या धमकी नंतर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत पत्र लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची अधिक काळजी घेण्याच्या संदर्भात सूचना ठाणे पोलिसांना, पोलीस विभागाला देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस दलानेही त्यांच्या सुरक्षेची पुर्ण व्यवस्था करण्याची काळजी घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, त्यामुळे या चर्चा अनावश्यक आहेत असं स्पष्टीकरण वळसे पाटील यांनी दिले.

सुहास कांदे यांचा आरोप नेमका काय??

एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला होता, त्यानुसार त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार सुरु होता. मात्र त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई याना फोन करून एकनाथ शिंदे याना सुरक्षा देऊ नका असं सांगितले असा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला. एका मराठी माणसाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही त्यांची सुरक्षा व्यवस्था का नाकारण्यात आली असा सवाल कांदे यांनी केला.

Leave a Comment