घाबरण्याचे कारण नाही अध्यक्ष आघाडीचाच होणार; फडणवीसांच्या टीकेला वळसे पाटलांचं प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड झाली नाही. आता आघाडी सरकारकडून पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत हालचाली केल्या जात आहेत. पण आवाजी पद्धतीने मतदान घेतले जाणार असल्याचे सांगितले जात असल्याने याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे. “घाबरण्याचे कारण नाही निश्चितपणे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार आहे” असे पाटील यांनी सांगितले आहे.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारमधील वरिष्ठांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे हात वर करून निवडणूक घेत आहे. सरकार घाबरत असल्याची टीका केल्यानंतर यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकारकडे पूर्णपणे बहुमत आहे. आणि अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच घेतली जाणार आहे. सरकारकडे बहुमत असल्याने सरकारला घाबरायचे काहीच कारण नाही, असे पाटील यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारकडून हालचाली केल्या जात आहेत. लवकरच आध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, याबाबत भाजपकडून आघाडी सरकारवर अनेकवेळा टीका करण्यात आली आहे. फडणवीसांनीही काल अध्यक्षपदाच्या निवडीवरून टीका केली होती. फडणवीसांच्या या टीकेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

Leave a Comment