आता जर सदावर्ते सुधारले नाहीत तर..यापुढची चर्चा शिवसेना त्यांच्या घरात जाऊन करेल…

सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी झालेल्या एस.टी. कर्मचार्‍यांच्या हल्ल्यानंतर त्यावर अनेक टिका टिपण्या झाल्या. या सर्वाच्या पाठिमागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलिसांनी घेत रात्री उशीरा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. आज सदावर्ते यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांनी पोलिस कोठडी सुनावलीय. यावर आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

आता जर सदावर्ते सुधारले नाही तर पुढची चर्चा शिवसेना, युवासेना त्यांच्या घरीच करतील अशा शब्दात सय्यद यांनी सदावर्ते यांना बजावलं आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून आझाद मैदानात एसटी कर्मचारी आंदोलन करत होते. मात्र शुक्रवारी अचानक या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी शरद पवारांच्या निवासस्थानावर दगड, चप्पल भिरकावल्याचे दिसून आले. यादरम्यान मुंबईत गावदेवी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने अजून पोलीस कोठडी सुनावली आहे.