दीपाली सय्यद यांच्याबाबत सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य; सय्यद यांच्याकडून माफीची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | खासदार सुजय विखे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात आपण महिला आयोगाकडे जाणार असल्याची माहिती अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दिली आहे. विखे यांनी माफी मागावी अन्यथा मी महिला आयोकडे याबाबत दाद मागेन असा इशारा सय्यद यांनी दिला आहे. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

देखणा व्यक्ती आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे असं विधान विखे यांनी केलं होतं. आता अभिनेत्री सय्यद यांनी विखे यांच्या या वादग्रस्त विधानावरुन सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे. एका सुजान आणि सुसंस्कृत घरातून आलेल्या आणि स्वत; खासदार असणार्‍या व्यक्तीला असे विधान करणं शोभत नाही असं सय्यद यांनी म्हटलं आहे.

सुजय यांनी माझी जाहीर माफी नाही मागितली तर मी महिला आयोकडे जाणार आहे असा इशाराही सय्यद यांनी दिला आहे. यामुळे सय्यद यांच्यावरील वादग्रस्त विधान सुजय यांना आता भोवणार असल्याचं दिसत आहे.

दीपाली सय्यद यांच्याबाबत सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य; सय्यद यांच्याकडून माफीची मागणी

Leave a Comment