Sunday, June 4, 2023

राम गोपाल वर्माच्या कोरोनावरील जगातील पहिल्या सिनेमाचा ‘ट्रेलर व्हायरल’

मुंबई । कोरोनाच्या विळख्यातून जगाची सुटका कधी होईल याचं उत्तर सध्या कोणाकडेही नाही आहे. आपल्या देशात कोरोनाच्या रुग्णांची सध्या झपाट्यानं वाढत आहे. इतकंच नाही सोशल डिस्टन्सिंग अजूनही गांभिर्यानं घेतलं जात नाही आहे. याच विषयावर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली असून याचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला आहे.

या चित्रपटाचं नावही ‘कोरोना व्हायरस’ असं ठेवण्यात आलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटव्दारे या चित्रपटाची घोषणा केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला. ‘करोना व्हायरस चित्रपटातील फॅमिली डिस्टन्सिंगचा एक फोटो…लॉकडाऊनवर आधारित, लॉकडाऊन दरम्यान शूट झालेला चित्रपट’,असं कॅप्शनही त्यांनं दिलं आहे.

कोरोनावर तयार झालेला हा जगातील पहिला सिनेमा असल्याचा दावा या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे. केवळ बाहेर नव्हे तर घरात देखील सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं असा संदेश या ट्रेलरमधून दिला गेला आहे. डिस्टन्सिंगचा घरातील नातेसंबंधावर झालेला परिणाम देखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”