रिटर इंडिया प्रा.लि.कंपनीकडून कोरोना बचावासाठी 100 सुरक्षित मास्कचे वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | शासकीय विश्रामगृह, सातारा येथे सामाजिक बांधिलकी म्हणून रिटर इंडिया प्रा.लि.कंपनीकडून कोविड सुरक्षिततेसाठी PAPR (Powered Air Purifying Respirator) या 100 सुरक्षित मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी राज्याचे सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. वाटप करण्यात आलेले मास्क अत्याधुनिक असून यामध्ये 99.8 टक्के शुद्ध हवा येते, त्यामुळे कसलाही थकवा जाणवत नाही, वजनाला हलके असल्यामुळे कोणताही त्रास होत नाही. कोविडमध्ये काम करणारे डॉक्टर्स व मेडिकल स्टाफ यांना मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, रिटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल कुडाळ, व्हाईस प्रसिडेंट ऑपरेशन्स योर्ग शाईड, एच.आर प्रमुख निलेश जंगम, सेफ्टी अँड ऍडमिनिस्ट्रेशन प्रमुख शैलेंद्र कुलकर्णी, परिविक्षाधीन IAS थॉमस रीचर्डस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, सातारचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, नगर प्रशासन अधिकारी अभिजित बापट, तहसीलदार आशा होळकर आदी उपस्थित होते.

Leave a Comment