कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 14 मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या काळात वाढदिवसाच्या सर्व कार्यक्रम रद्द करत केवळ सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती विजयसिंह यादव यांनी दिली.
त्याप्रसंगी विजयसिंह यादव, माजी नगराध्यक्ष संगीता देसाई, नगरसेविका स्मिता हुलवान, राहुल खराडे, तुषार खराडे, नईम पठाण, अमोल बनसोडे, राहुल काळे, सागर गवळी, विशाल बनसोडे, परेश माने, गणेश आवळे, रामभाऊ काळे, प्रशांत कर्वे, आकाश कदम, गणेश खराडे, निखील जगताप, सुभाष शिंदे, दत्ता शिंदे, प्रकाश आडवी, आकाश घेवारी, अजित धुमाळ, अजित पाटील, अमोल चौगुले, सचिन कदम, सचिन आवळे, आकाश घोडके, संतोष भिसे, अनिकेत दुपटे, विजय खडतरे, विठ्ठल भिसे, विशाल वायदंडे, माणिक खराडे, शुभम कदम, बाळू गवळी, कुंडलिक धुमाळ, अॅड. दिग्विजय जाधव, विनोद शिंदे व विजयसिंह यादव मित्रपरिवार उपस्थित होता.
विठ्ठल नगर, डवरी वस्ती कार्वे नाका व झोपडपट्टी याठिकाणी या जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. सदरच्या मदतीबद्दल नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.