जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटीलच राहतील : आ. अंबादास दानवे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष व तथा शिवसेनेचे नव्याने प्रवेश केलेले नितीन पाटील हेच राहतील, अशी माहिती आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, पालक मंत्री सुभाष देसाई अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर माजी आमदार नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यास शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले कृष्णा पाटील डोणगावकर व देवयानी डोणगावकर यांनीही पुन्हा प्रवेश केला. आमदार अंबादास दानवे म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील हेच राहतील, या विषयी उद्या व परवा बैठक होऊन हा निर्णय जाहीर करण्यात येणार आहेत. नितीन पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्हा बँकेत शिवसेनेची संख्याबळ वाढले असून पहिल्यांदाच जिल्हा बँक शिवसेनेच्या ताब्यात आली आहेत असा उल्लेखही आमदार अंबादास दानवे यांनी केला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदासाठी नितीन पाटील यांच्यासह आमदार अंबादास दानवे यांच्याही नावाची चर्चा होती मात्र आज पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी अधिकृतरित्या नितीन पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर नितीन पाटील यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला आहे.

Leave a Comment