गंगापूर तहसील कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘सरप्राइज भेट’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सकाळी अचानक व अनपेक्षितरित्या गंगापूर तहसील कार्यालयास भेट दिली. यावेळी भेटी दरम्यान वेळेवर उपस्थित नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावांची नोंद घेण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी परिसर स्वच्छ करणे, झाडांची निगा राखणे, खिडक्यांना पडदे लावणे, दस्तऐवज व्यवस्थतीत ठेवणे व सुंदर माझे कार्यालय अभियानांतर्गत कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. यापुढेही अनपेक्षितरित्या पाहणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी कमीत कमी तीन झाडे लावली व ती जगवलीच पाहिजे असे म्हणत वृक्षरोपण व संवर्धन वर त्यांनी भरदेण्याचे आवाहन केले.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ठाकूर यांना महिलांसाठी सुलभ शौचालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, तहसीलदार सारिका शिंदे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment