लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची गावोगाव भेट

औरंगाबाद – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊ नये यासाठी पात्र नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात स्वत:चे लसीकरण करुन घ्यावे. लस पुर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना झाला तरी लस घेतलेली असेल तर त्रास कमी होतो आणि कमी कालावधीत आपण बरे होतो. लसीकरण वाढावे यासाठी जिल्ह्यातील ज्या गावाने शंभर टक्के लसीकरण केले आहे अशा पहिल्या 25 गावांना मी विकासकामांमध्ये अतिरिक्त निधी देणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण् यांनी सांगितले.

जिल्हाभरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी चव्हाण सरसावले असून लसीकरण मोहिमेला गती देऊन जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी गावागावात जाऊन लोकांना प्रशासनाकडून प्रोत्साहित केले जात आहे. आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गल्लेबोरगाव, वेरुळ, तलाववाडी, सुलिभंजन, कागजीपुरा येथे गा्रमसभा पार पडल्या. या ग्रामसभेत त्यांनी लसीकरण करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, चेअरमन तुकाराम हारदे, पोलीस पाटील सिंधू बढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पांडवे, यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

You might also like