Friday, June 2, 2023

घटस्फोटित पत्नीला चाकूच्या धाकाने विवस्त्र करीत मारहाण

औरंगाबाद | घटस्फोट दिलेल्या पत्नीच्या घरी बळजबरीने घुसून चाकूच्या धकाने तिला विवस्त्र करीत मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता मुलांना भेटण्यासाठी बळजबरीने तिला गुजरात राज्यातील सुरत येथे घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील जवाहरनगर भागात समोर आला आहे.

या प्रकरणी पीडितेच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नथु भोई असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

महिलेने दिलेली अधिक तक्रार अशी की, पीडित घटस्फोटित महिला ही शहरातील शिवशंकर कॉलनी भागात भाड्याच्या खोलीत राहते. 20 डिसेंबर रोजी रात्री महिलेच्या घरी तिचा पहिला पती आला. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या आरोपी प्रवीणने चाकूचा धाक दाखवत महिलेला विवस्त्र करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बळजबरी महिलेला गुजरात राज्यातील सुरत येथे मुलांना भेटण्यासाठी घेऊन गेला. महिलेच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गायके करीत आहेत.