लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड
शिरवळ (ता.खंडाळा) येथील ग्रामपंचायतीच्या खाली मोकळ्या जागेत दिव्यांगांनी उदरनिर्वाहासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. शिरवळ ग्रामपंचायत मालकी हक्काचे व्यवसायिक १५० गाळे आहेत, त्यापैकी शासकीय नियमा नुसार दिव्यांगाना ५% राखीव गाळे दिले जात नाही .तोपर्यंत बेरोजगार दिव्यांगानी ग्रामपंचायत खाली मोकळ्या जागेत छोटा व्यवसाय करण्याचे ठरविलेले आहे.
याबाबतचे निवेदन “प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या”खंडाळा तालुका महिला अध्यक्ष समिना शेख यांनी शिरवळ ग्रामपंचायत व शिरवळ पोलीसांना दिलेले होते.
४ मार्च रोजी उदरनिर्वाहासाठी दिव्यांग बचत गटाच्या वतीने ग्रामपंचायती खाली घरगुती सामान विक्रि व्यवसाय सुरू करण्यात आलेला आहे. दिव्यांगाना जोपर्यंत गाळे मिळणार नाहीत तोपर्यंत दिव्यांगांचा व्यवसाय हा ग्रामपंचायत खालीच चालणार असल्याचे समिना शेख यांनी म्हटलेले आहे.
३ वर्षे याबाबत सतत कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारी, शिरवळ ग्रामपंचायत ला दिव्यांगाच्या समस्ये बाबत निवेदन देण्यात आली आहेत. गाळे होतील तेव्हा दिले जातील, अशी उत्तरे दिव्यांगांना मिळत आहे. बस मध्ये दिव्यांग राखीव सिट मोकळी करून दिली जाते. तर गाळे मोकळे करून का दिले जात नाही. दिव्यांग राखीव गाळ्यांचे करार केलेच कसे हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शिरवळ स्मशानभूमीत फक्त जागा उरली गाळ्यासाठी तिथे लाकडे विकायची का दिव्यांगानी अशी संतप्त भावना समिना शेख यांनी व्यक्त केली. राखीव गाळे दिव्यांगाना न देता पोटभाडेकरु ठेवणाऱ्या इतर लोकांना दिली गेली.एका व्यक्तीच्या नावे दोन दोन गाळे दिली गेली.
आपल्या हक्कासाठी जर दिव्यांगानी स्वतः च्या हक्काचे राखीव गाळ्यांचे टाळे काढुन हस्तांतर केले, किवा आक्रमक आंदोलन केले, किंवा आत्मदहन करण्याचा इशारा दिला तरी सर्व कार्यवाही दिव्यांगावर होणार परंतु सतत ची हेळसांड करणाऱ्या, शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कोणताही पोलीस, वरिष्ठ अधिकारी अपंग हक्क कायद्या अंतर्गत कार्यवाही करणार नाही, उलट चुकणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला जातो.काहींना फक्त मतदानाच्या वेळी अपंग आठवतात.अशी संतप्त भावना समिना शेख व त्यांच्या सहकार्यानी व्यक्त केलेली आहे.सरकार राजकारणावर चालते शासकीय नियम,समाजकारण याला शुन्य महत्त्व दिले जाते.हे यातुन स्पष्ट होते.असे म्हणणे असून ८ मार्च ला “महिला दिना” निमित्त महिला सबलीकरण, अपंग सक्षमीकरण यावर भाषण करणाऱ्यांनी त्या भाषणावर अंमलबजावणी करावी. याबाबतची आठवण ही करून देण्यात आलेली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’