नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळीचा सण जवळ आला आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकांना आपल्या घराच्या अंगणात एखादी कार असावी असे वाटत असते. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा कंपन्यांनी कारवर मोठ्या प्रमाणात सूट जाहीर केली आहे. लोकांची पसंती लक्षात घेऊन Hyundai India ने दिवाळीपूर्वी निवडक वाहनांवर दिवाळी ऑफर जाहीर केल्या आहेत.
Hyundai Aura, Hyundai Grand i10 Nios, Hyundai i20 आणि Hyundai Kona Electric वर कंपनी Rs 1 लाखांपर्यंत सूट देत आहे. हे फक्त रोख आणि एक्सचेंज ऑफरच्या स्वरूपात उपलब्ध असतील. या सर्व ऑफर देशभरातील अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध आहेत आणि 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत हि ऑफर उपलब्ध आहे.
Hyundai Aura वर Rs.33 हजार पर्यंत सूट
Hyundai Aura हॅचबॅकचे सर्व प्रकार – पेट्रोल (5,000 पर्यंत) आणि CNG (20,000 पर्यंत) 33,000 पर्यंत सूट देऊन ऑक्टोबर महिन्यात खरेदी केले जाऊ शकतात. या सवलती रु.10,000 पर्यंत रोख आणि एक्सचेंज बोनसच्या स्वरूपात उपलब्ध असतील. ही ऑफर सरकारी आणि कॉर्पोरेट कर्मचार्यांसाठी 3,000 रुपयांच्या सवलतीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
This festive season, upgrade to a brand new Hyundai. Get the best price of your car along with the trust of Hyundai.
To know more, click here: https://t.co/7yiOUqc6IX#Hyundai #HyundaiIndia #HyundaiPromise #TrustofHyundaiPromise #Preownedcars #Usedcars pic.twitter.com/5bjLQU3h9t— Hyundai India (@HyundaiIndia) October 16, 2022
Grand i10 Nios वर 48,000 सूट
Hyundai Grand i10 Nios हि कार 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये देण्यात आली आहे. कारचे पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल 48,000 रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह विकले जात आहेत. सरकारी आणि कॉर्पोरेट कर्मचार्यांसाठी रोख ऑफर (35,000 पर्यंत), एक्सचेंज डिस्काउंट (रु. 10,000 पर्यंत) आणि फायदे (रु. 3,000 पर्यंत) या स्वरूपात सूट मिळू शकते. म्हणजेच, एकूणच Grand i10 Neos वर 48 हजार रुपयांची सूट मिळू शकते.
Hyundai i20 वर 20 हजार सूट
Hyundai i20 ऑक्टोबर महिन्यात 20,000 पर्यंत डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यामध्ये 10,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. ही सवलत हॅचबॅकच्या पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांवर लागू आहे. ही सवलत देशभरातील अधिकृत Hyundai डीलरशिपवर उपलब्ध असेल. Hyundai ने इलेक्ट्रिक कारवरही मोठी सूट दिली आहे. Hyundai Kona इलेक्ट्रिकवर ऑक्टोबर महिन्यात कमाल 1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या सवलतीमध्ये फक्त रोख ऑफर समाविष्ट आहेत. वाहनावर कोणताही एक्सचेंज बोनस किंवा कॉर्पोरेट लाभ नाही. Hyundai Kona ची सुरुवातीची किंमत 23.84 लाख रुपये आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय