Diwali Offer : सोन्याच्या खरेदीवर PhonePe देतंय स्पेशल Discount, जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Diwali Offer : यंदाच्या वर्षी धनत्रयोदशीच्या आधी ऑनलाइन पेमेंट ऍप असलेल्या PhonePe कडून आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. आता या सणासुदीच्या काळात PhonePe कडून Golden Days Campaign अंतर्गत सोन्या-चांदीच्या खरेदीवर कॅशबॅकची ऑफर दिली जात आहे. चला तर मग याबाबत सविस्तरपणे जाणून घेउयात…

Trending news: Gold: Up to Rs 2500 off on buying gold from here, know offers from other platforms as well - Hindustan News Hub

या ऑफर बाबत कंपनीने सांगितले कि, आता ग्राहकांना धनत्रयोदशीच्या ऑफरचा लाभ घेता येईल. या अंतर्गत सोन्याच्या खरेदीवर 2,500 रुपये तर चांदीच्या खरेदीवर 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. मात्र ही ऑफर 26 ऑक्टोबरपर्यंतच सुरु असेल. Diwali Offer

याबाबत एक निवेदन देत कंपनीने सांगितले कि, सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशी हा शुभ दिवस आहे. अशा परिस्थितीत, PhonePe कडून आपल्या ग्राहकांसाठी आपल्या App वर 1,000 रुपये किंवा त्याहून जास्तीच्या सोन्या-चांदीच्या खरेदीवर मोठी सूट दिली जात आहे. कंपनीने पुढे म्हटले की, आता जे ग्राहक 26 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत सोने किंवा चांदी खरेदी करतील. ते या कॅशबॅक ऑफरसाठी पात्र ठरतील. Diwali Offer

PhonePe Golden Days Campaign: Exciting offers on gold, silver for Dhanteras 2022 — How you can avail discount, cashback | Zee Business

PhonePe App वर सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे :

सर्वांत आधी PhonePe App वर जा.
त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या वेल्थ आयकॉनवर क्लिक करा.
यानंतर आपल्या खरेदीच्या प्राधान्यानुसार गोल्ड/सिल्व्हर आयकॉनवर क्लिक करा.
आता ‘Start Accumulating’ किंवा ‘By More Gold’ वर क्लिक करा.
पुढे रक्कम एंटर करा आणि प्रोसीडवर क्लिक करा.
नंतर ‘प्रोसीड टू पे’ वर क्लिक करून खरेदी पूर्ण करा.

PhonePe ने म्हटले की, आमच्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना 99.99 टक्के शुद्धतेच्या 24K सोन्याचांदीची खरेदी करता येईल. त्याच बरोबर सोन्याच्या प्रत्येक नाण्यांच्या खरेदीसाठी शुद्धतेचे प्रमाणपत्रही दिले जाईल. तसेच यामध्ये ग्राहकांना उच्च दर्जाची सोन्या-चांदीची नाणी आणि बारसाठी डोअरस्टेप डिलिव्हरीची सुविधा देखील मिळेल. तसेच डिजीटल पद्धतीने खरेदी केलेल्या या सोन्याच्या मेकिंगसाठी कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाहीत. त्याचबरोबर ते बँकेच्या-ग्रेड गोल्ड लॉकरमध्ये फ्रीमध्ये साठवले जाते. याची खास गोष्ट अशी कि, याचा विमा देखील उतरवला जातो. Diwali Offer

Dhanteras 2022: Buy gold and silver from your mobile, getting benefits up to Rs 2500

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ???

सोन्याची शुद्धता ही त्याच्या कॅरेटवरून कळते. सामान्यतः 24 कॅरेटचे सोने हे सर्वात शुद्ध मानले जाते. मात्र यापासून दागिने बनवता येत नाहीत. हे लक्षात घ्या कि, दागिने बनवण्यासाठी सहसा 22 कॅरेटचे सोने वापरले जाते. चला तर मग कोणत्या कॅरेटचे सोने किती शुद्ध आहे ते जाणून घेऊयात… Diwali Offer

24 कॅरेटचे सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते.
23 कॅरेटचे सोने 95.8 टक्के शुद्ध असते.
22 कॅरेटचे सोने 91.6 टक्के शुद्ध असते.
21 कॅरेटचे सोने 87.5 टक्के शुद्ध असते.
18 कॅरेटचे सोने हे 75 टक्के शुद्ध असते.
17 कॅरेटचे सोने हे 70.8% शुद्ध असते.
14 कॅरेटचे सोने 58.5 टक्के शुद्ध असते.
9 कॅरेटचे सोने हे 37.5% शुद्ध असते.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.phonepe.com/

हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बोनससहीत मिळेल गॅरेंटेड रिटर्न
Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले
Ola S1 Pro vs Honda Activa 6G : कोणती गाडी खरेदी करणे फायद्याचे? किंमत अन् फिचर्स तपासा
5 Rupees Note : 5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे नवीन दर पहा