व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Diwali Sale : ‘हा’ महागडा स्मार्टफोन झाला खूपच स्वस्त; 50 MP कॅमेरा अन् बरंच काही..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सेल म्हंटले कि लोकंच्या आनंदाला पारा उरत नाही. त्यामुळे लोक या सेलची आतुरतेने वाट बघत असतात. या सेलमध्ये ग्राहकाला स्मार्टफोन, गॅजेट्स, अ‍ॅक्सेसरीज यांसारख्या वस्तू कमी किमतीत खरेदी करता येतात. सध्या आज आम्ही तुम्हाला एका अशा स्मार्टफोनबद्दल (Redmi 10 Samartphone) सांगणार आहे तो तुम्हाला या सेलमध्ये खूप कमी किमतीत मिळणार आहे. 6000mAh बॅटरी क्षमता असणारा Redmi 10 (Redmi 10 Samartphone) हा फोन तुम्ही फक्त 8,099 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुम्ही फोन (Redmi 10 Samartphone) खरेदी करण्यासाठी बजेट फोनची वाट पाहत असाल, तर हा फोन तुमच्यासाठी योग्य आहे.

Redmi 10 या फोनची खासियत
Redmi 10 फोनमध्ये (Redmi 10 Samartphone) 6.71-इंचाचा IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याला WIDEVINE L1 सपोर्ट आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लासचा वापर करण्यात आला आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 6nm प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU वापरण्यात आला आहे. या Redmi 10 फोनच्या मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा सेन्सरसह 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा सेंसर उपलब्ध आहेत.

याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Redmi 10 मध्ये 5- मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. पॉवरसाठी, Redmi 10 मध्ये 6000 mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या Redmi 10 फोनमध्ये (Redmi 10 Samartphone) 3.5mm हेडफोन जॅक आणि गाण्यांसाठी 1.5W स्पीकरसुद्धा देण्यात आले आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!