दिल्लीतील इस्राईली दूतावासाजवळ स्फोट; परिसरातील सुरक्षेत केली वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनामुळे सध्या चर्चेत असणार्‍या दिल्ली येथे एक स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली येथील इस्राईली दूतावासाजवळ येथे स्फोट झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील इस्राईली दूतावासाजवळ एक कमी क्षमतेचा स्फोट झाल्याची माहिती मिळाला आहे. स्फोटाचे स्वरूप अजून समजले नसून घटनास्थळी तुटलेल्या काचांचे तुकडे पडलेले आहेत. सध्या तरी या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

सुरक्षा यंत्रणा पुढील तपास करत आहेत. परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस बळाला पाचारण करण्यात आलं आहे.

Leave a Comment