हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन DMart Employees Salary । DMart तर तुम्हाला माहितीच असेल किंवा तुमच्या घराच्या जवळील शहरात ते नक्कीच असेल.. माणसाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू, मग त्या कपड्यांपर्यंत ते अगदी किचन मधील भांड्यांपर्यंत… आंघोळीच्या साबणापासून ते गहू- तांदळापर्यंत , कोणती वस्तू नाही असं कधीच डीमार्ट मध्ये बघायला मिळणार नाही.,,, ग्राहकांना सर्वकाही एकाच छताखाली देणाऱ्या डीमार्टची स्थापना केली राधाकृष्ण दमाणी यांनी… मुंबईतून सुरु झालेलं डीमार्ट पुढे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. भारतभर 330 पेक्षा जास्त शाखा डीमार्टच्या आहेत… हजारो युवकांच्या हाती काम देण्याचं काम डीमार्टने केलं… आजही अनेक तरुण मुले मुली मोठ्या उत्साहाने डीमार्ट मध्ये नोकरी करत असतात. परंतु डीमार्ट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार किती असतो हे तुम्हाला माहितेय का? चला तर मग आज आम्ही तुम्हाला याबद्दल सर्व काही सांगतो.
पदानुसार पगारही वेगवेगळा– DMart Employees Salary
DMart मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार हा त्यांच्या पदानुसार वेगवेगळा असतो. त्यापैकी,
1) सेल्स असोसिएट / कॅशियर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 12,000 ते 14,000 रुपये पगार (DMart Employees Salary) मिळतो. हे कामगार बिलिंग करणे, वस्तू व्यवस्थित लावणे आणि डीमार्ट मध्ये आलेल्या ग्राहकांना मदत करणे यांसारखी कामे करतात.
2) स्टोअर स्टाफ / रिटेल असिस्टंट या पदावर काम करणाऱ्या डीमार्ट कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 10,800 ते 14,200 रुपये पगार मिळतो. या कामगारांचे काम मालाची उचल-खाल ठेवने, ग्राहक सेवा आणि शेल्फ व्यवस्थित ठेवणे हे असते.
3) सुपरवायझर / सेक्शन हेड डीमार्ट मध्ये सुपरवायझर किंवा सेक्शन हेडला 18,000 ते 25,000 रुपयांपर्यंत पगार (DMart Employees Salary) देण्यात येतो. हे कामगार त्यांच्या विभागातील एकूण कामकाज कस चाललंय ते बघतात. तसेच टीम मॅनेजमेंटचे काम करतात.
4) Assistant Store Manager / Deputy Manager या पदासाठी दर महिन्याला तब्बल 30,000 ते 52,000 रुपयांपर्यंत पगार मिळतो. हे कर्मचारी स्टोअर मॅनेजरला मदत करतात, तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या शिफ्टचे मॅनेजमेंट पाहतात.
५) स्टोअर मॅनेजर हे डीमार्ट मधील एक महत्वाचं पद असून या पदावर काम करणाऱ्यांना दर महिन्याला 40,000 ते 90,000 रुपये पगार मिळतो. संपूर्ण स्टोअरचे व्यवस्थापन, विक्री देखरेख आणि कर्मचारी नियंत्रण अशा जबाबदाऱ्या स्टोअर मॅनेजरला पार पाडाव्या लागतात.
याशिवाय, Legal Officer ला दरवर्षाला 3.3 लाख रुपये, Legal Manager ला वार्षिक 11 लाख रुपये, Real Estate Manager ला 14 ते 15 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असते. तसेच Structural Designer पदासाठी ₹70,000 पेक्षा जास्त पगार (DMart Employees Salary) दर महिन्याला देण्यात येतो.