दातदुखीचा त्रास आहे?? ‘हे’ 5 घरगुती रामबाण उपाय कराच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दात दुखणे ही एक सामान्य समस्या आहे. जवळपास सर्वानाच कोणत्या ना कोणत्या क्षणी दातदुखीचा सामना करावाच लागतो. एकदा का दात दुखायला लागला तर त्याच्या वेदना सहन करताना भल्याभल्याना अवघड जात. दातदुखीमुळे आपल्याला जेवताना आणि बोलताना त्रास होतो. कधी कधी आपलं तोंडही सुजते. त्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर उपाय केलेले कधीही चांगलच. आज आपण जाणून घेऊया दातदुखी वरील काही घरगुती उपाय ..

कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या-

कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास दातदुखीवर मोठा उपाय ठरू शकतो. मीठ हे नैसर्गिक जंतुनाशक असल्याने कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास दातांना आरोम मिळतो. दिवसातून 4-5 वेळा ही प्रक्रिया केल्यास तुमची दातदुखी काही दिवसांतच दूर होईल.

​मिरे पावडर-

एक चतुर्थांश चमचा मिठात एक चिमटभर ‌मिरे पावडर मिसळून दात दुखणाऱ्या भागात लावावे. यामुळे दातदुखीचा त्रास होणार नाही.

बर्फाचा शेक-

एखाद्या रुमालात बर्फाचे तुकडे गुंडाळून दाताला शेक द्या. बर्फाच्या थंडाव्याने रक्त गोठून वेदना शांत होतात.

लवंग-

दातदुखीवर लवंग लावण्याचा सल्ला हा सर्वच जण देतात. लवंगेत युजेनॉल नावाचे अँटिसेप्टिक असते. दुखणाऱ्या दातावर लवंग ठेवल्याने आराम मिळू शकतो. त्याचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म संसर्ग कमी करण्यास मदत करतात.

लसूणच्या कळ्या चावा –

लसूण सुद्धा दातदुखीवर रामबाण उपाय मानला जाईल. बॅक्टरीया मारायला लसूण हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे कच्चा लसूण चावून त्याचा रस दुखणाऱ्या दाता पाशी न्यावा. त्यामुळे दातदुखी थांबेल